Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय आश्रम शाळा दळवट येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम ...


कृष्णा पवार@ग्रामीण प्रतिनिधि नाशिक 

कळवण -  दिनांक 24/12/2024 रोजी राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय कळवण वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत पवार सर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बंगाळ सर, दळवट प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीयअधिकारी डॉ. गवळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आश्रम शाळा दळवट येथील इयत्ता 11 वी व 12 वीच्या मुलींची हिमोग्लोबीन तपासणी व सिकल सेल तपासणी करून त्यांना हिमोग्लोबीन विषयी माहिती? हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी काय करावे? पोषक आहार कसा असावा? नियमित व्यायाम व इतर आवश्यक बाबीविषयी तसेच सिकल सेल म्हणजे काय? त्याची लक्षणे? ती तपासणी का आवश्यक आहे? त्यावर उपाय योजना आणि घ्यावयाची काळजी, मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि सद्या स्थितीत स्किन ची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती सिकल सेल टेक्निशियन स्नेहल जाचक आणि RKSK समुपदेशक अनिल चव्हाण यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शाळेचे मुख्याधयापक सर, बोरसे सर, अधीक्षक मॅम, शिक्षक शिक्षकतर कर्मचारी इ. उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉ गवळी सर, लॅब असिस्टंट नाना, दिपक बागुल, सिकल सेल टेक्निशियन स्नेहल जाचक मॅम,RKSK समुपदेशक अनिल चव्हाण, बोरसे सर व सहकर्मचारी ई. उपस्थित होते.