Ticker

6/recent/ticker-posts

रस्ता दुरुस्तीच्या कामात माती मिश्रित मुरमाचा वापर!


                                                वाडेगाव चिंचोली रस्त्यावरील चित्र 

राजकुमार चिंचोळकर  बाळापूर 

   तालुक्यातील वाडेगाव चिंचोली रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेला माती तर रस्ता दुरुस्तीच्या कामात माती मिश्रित मुरमाचा वापर केला जात असल्याचा अजब प्रकार समोर येत असल्याने प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.वाडेगाव ते चिंचोली गणु अंदाजे पाच किलोमीटर अंतर असुन हाच रस्ता चिंचोली पासून जिल्ह्यातील अखेरचे गाव म्हणजे च धाडी बल्हाडी पर्यंत जोडलेला आहे. तर या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था निर्माण झाल्याने वाहन चालकांना आपले वाहन चालवताना रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून रस्ता शोधत तारेवरची कसरत करावी लागत होती.

 त्यामध्ये चार चाकी तसेच दुचाकी ला किरकोळ स्वरूपात अपघात होवून चालक तसेच प्रवासी वाहनांतील प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बऱ्याच प्रतिक्षेनंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु रस्त्याच्या कडेला माती व रस्ता दुरुस्तीच्या कामात माती मिश्रित मुरमाचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शासना कडून लाखो रुपये खर्च करून सुद्धा रस्त्याची करण्यात येणाऱ्या दुरुस्तीचे आयुष्यमान किती ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे एकीकडे नागरीकांसाठी  दळणवळण व्यवस्था सुखकर करण्यासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होत असला तरी निकृष्ट दर्जाचे काम करुन शासनाच्या पैशाला चुना लावला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. भरमसाठ निधी उपलब्ध होत असताना आवश्यकतेनुसार चांगल्या प्रकारे रस्त्याचे काम होणे अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत 


 सुरू असलेल्या वाडेगाव चिंचोली रस्त्याच्या कामाची रस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याच्या कडेला माती तर रस्ता दुरुस्तीच्या कामात माती मिश्रित मुरमाचा वापर असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संमधीताकडे चर्चा करणार आहे वेळप्रसंगी तक्रार सुध्दा करण्यात येईल.--राम गव्हाणकर  संमधीत जि.प. सदस्य 


रस्त्याच्या कामात माती चा वापर दिसून येत आहे त्यामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा होणार हे नक्की आहे. या बाबतीत संमधीत पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे -राजेंद्र घाटोळ शेतकरी वाडेगाव