Ticker

6/recent/ticker-posts

सुरगाण्यात १०० केव्हीची डीपी बसविण्याचे काम सुरू



सुरगाणा : सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा शहर बंद ठेवल्याची गांभीर्याने दखल घेत नवीन डीपी बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

         सुरगाणा शहराला अतिशय कमी दाबाने व केव्हाही खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरवासीय मागील काही महिन्यांपासून अतिशय त्रस्त झालेले होते. त्यामुळे व्यावसायिकांचे देखील नुकसान होत होते. योग्य दाबाने आणि सुरळीत वीजपुरवठा दिला जावा, अशी मागणी वेळोवेळी करूनही दुर्लक्ष केले जात होते. अखेर नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेवक सचिन आहेर, दीपक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी बेमुदत सुरगाणा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊन बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.

        या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी साडेचार वाजेच्या दरम्यान सुरगाणा येथे आलेले कार्यकारी अभियंता विश्वजित पाटील यांनी ६५ केव्हीच्या ऐवजी १०० केव्हीची डीपी बसवून इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन पाटील यांनी

दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून ६५ केव्ही असलेल्या ठिकाणी १०० केव्हीची डीपी बसविण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन योग्य दाबाने आणि सुरळीत वीजपुरवठा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.