Ticker

6/recent/ticker-posts

अंबड येथे दत्तजयंतीनिमित्त २९ जणांचे रक्तदान.



अंबड/प्रतिनिधी. मयूर वाव्हळ 

अंबड येथील श्रीस्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. या उत्सवात १४० भाविकांनी श्री गुरु चरीत्र पारायण केले. श्री दत्त महाराजांची भव्य पालखी मिरवणूक, फराळदान, नाम जप, एक हजार भाविकांना अन्नदान यासह आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २९ भाविकांनी रक्तदान केले.या शिबिरामध्ये पुनम प्रशांत खोमणे, वैष्णवी विनायक मोगल, मनिषा खराबे, पुनम पांडुरंग जामदरे, छाया पंढरीनाथ जाधव, पुरुषोत्तम ढोले, किशोर मुर्तडकर, राहुल लाहोटी, शरद जाधव, ऋषीकेश मोटकर, दिनेश काकडे, अशोक काळे, किशन जाधव, अनिल देशमुख, भाऊसाहेब तौर, मयुर वाव्हळ, विनायक, विशाल चव्हाण, संकेत डवरे, यशवंत बिराजदार, संदीप पालवे, साईनाथ म्हस्के, रविंद्र मुंढे, विठ्ठल शेटे, कपिल राऊत, भाग्येश रवनेकर, विनोद शिंदे, नरेंद्र माटोले, नामदेव रेडे आदींनी रक्तदान केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष सतीश सोडाणी, सहसचिव डॉ. सतीष सारडा, कोषाध्यक्ष दत्तात्रय वराडे, सदस्य रमेश सोनवणे, व्यवस्थापक पंढरीनाथ जाधव, पुजारी आदेश शुक्ला, कर्मचारी पुरुषोत्तम ढोले, दीपक चौधरी, शंकर पिरानाईक, सिध्देश्वर जाधव, प्रदिप जिगे, सेवेकरीअंबड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दत्तजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी दात्यांना प्रमाणपत्र वाटप करताना मान्यवर.

हरणे, मसुरे, दरक, प्रशांत खोमणे, गणेश सातपुते, उध्दव कानडे, मयुर वाव्हळ, पृथ्वीराज शिंदे यासह अनेक श्री स्वामी समर्थ महिला व पुरुष सेवेकरी व श्री जनकल्याण रक्तपेढी जालनाचे डॉ. शिवराज जाधव, डॉ. वंदना पाटील आदींनी परीश्रम घेतले.