मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : दि 19 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये सविधान विषयावर चर्चा करताना महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झाली आहे असे वक्तव्य केले अमित शहा यानी केलेल्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे या अनुषंगाने मालेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमान जनक टीका करणाऱ्या अमित शहा यांच्या निषेधार्थ तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देऊन त्यांना देशाच्या गृहमंत्री पदी राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही त्यांना तात्काळ गृहमंत्री पदावून हटवा अशी मागणी दिनांक 19 डिसेंबर रोजी मालेगाव शहरातील व तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये नमूद केले आहे की देशाच्या गृहराज्यमंत्री पदी असलेल्या अमित शहा यांनी देशाच्या गृहमंत्री असताना संविधानाची काटेकोर पणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे मात्र असे असताना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत खेदजनक व दुर्दैवी आहे. अमित शहा यांना देशातील सामाजिक वातावरण बिघडवायचे आहे का? जेणेकरून देशात असंतोष उफाळून येऊन त्यांना दंगली घडवायचे आहेत का? असेच शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून येते अमित शहा यांच्या वक्तव्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे अमिषा यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याने महामहीम राष्ट्रपती यांनी त्यांना तात्काळ गृहमंत्री पदावरून हटविण्यात यावे व देशाची एकात्मता अखंडता कायम ठेवावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
यावेळी रूपेश भगत ॲड. विजय बंन्सोड,जयेश शिंदे,कैलास तायडे, बबन बनसोड , गोवर्धन भाई चोथमल ,देवा भाई इंगळे ,अजाबराव सरदार ,रमेश तायडे गजानन वानखेडे,सुनील तायडे यांच्यासह तालुक्यातील व शहरातील अनेक आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin