Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावला यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल



२५ डिसेंबर ते चार जानेवारी; जिल्हा पोलिस प्रमुखांच्या सूचना


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली यात्रा २५ डिसेंबर ते चार जानेवारीदरम्यान होत आहे. यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पुसेगावसह परिसरातील रस्त्यावरील वाहतुकीत २५ डिसेंबर ते चार जानेवारी या कालावधीत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार वाहतुकीतबदल केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे असेल :

साताऱ्याकडून दहिवडीकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता नेर, ललगुण, राजापूर, कुळकजाई, मलवडीमार्गे दहिवडीकडे जातील किंवा साताऱ्याकडून दहिवडीकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता विसापूर फाटा, जाखणगाव, खातगुण, कटगुणमार्गे दहिवडीकडे जातील.दहिवडीकडून येणारी वाहने कटगुण, खातगुण, जाखणगावमार्गे विसापूर फाट्यावरून साताऱ्याकडे जातील किंवा दहिवडीकडून येणारी वाहने मलवडी, कुळकजाई, राजापूर, ललगुण, नेरमार्गे साताऱ्याकडे जातील.

वडूजकडून फलटणकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न येता खातगुण, जाखणगाव, विसापूर फाटा ते नेर ललगुणमार्गे फलटणला जातील. फलटणकडून वडूजकडे जाणारी वाहने नेर, ललगुण, विसापूर फाटा, जाखणगाव, खातगुणमार्गे वडूजकडे जातील. शिवाजी महाराज चौक, पुसेगाव येथून दहिवडी, वडूज, फलटण व साताऱ्याकडे (चौकापासून चारही बाजूस) २०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन राहील.वाहतूक ज्या ठिकाणावरून वळविली आहे, त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमला आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी नोंद घेऊन पोलिस दलास सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक पोमण यांनी केले आहे.