Ticker

6/recent/ticker-posts

दामिनी पथक ॲक्शन मोडवर, अंबड -जालना येथील महाविद्यालयांना भेटी...



प्रतिनिधी. मयूर वाव्हळ 

अंबड येथील एका महाविद्यालयीन तरुणीने टवाळखोराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली या घटनेनंतर जिल्ह्यात दामिनी पथक ॲक्शन मोडवर आले असून आज दिनांक गुरुवार तारीख 12 अंबडसह जालन्यातील  महाविद्यालयांना भेटी देऊन टवाळखोराना त्यांनी समज दिली

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयासह खाजगी शिकवण्याच्या परिसरात टवाळखुरांचा मोठा धुमाकूळ सुरू असतो यामध्ये टवाळीखोर दुचाकी स्पीड मध्ये पळवणे ,मुलींची छेड काढणे ,त्यांचा पाठलाग करणे असे नित्यनियमाने करत असतात त्यांचा बंदोबस्त करून मुलींना हिम्मत देण्यासाठी पोलीस दलात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने अंबड येथील घटना गांभीर्याने घेत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अंबडचे मच्छोदरी महाविद्यालय गाठले त्या ठिकाणी परिसरात फिरणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासले तसेच महाविद्यालय परिसरात विना ओळखपत्र कोणीही प्रवेश करू नये अशा सूचना त्यांना देण्यात आल्या पहिल्यांदा दिसले म्हणून सोडतो पुन्हा आढळला असतं याद राखा ....अश्या शब्दा मधे टवाळकरांना बजावले. तसेच अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे जाऊन त्यांनी पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली..