शिवप्रसाद कदम निवघा प्रतिनिधी
शिरड पाईपलाईनसाठी चांगले रस्ते खोदले जलजीवनच्या कामाला गुणवत्ता नाही!
निवघा बाजार मागील दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या जल जिवन मिशनअंतर्गतच्या पाणी पुरवठा योजनेची कामे ठेकेदारांच्या मनमानीपणे व थातूरमातूर पद्धतीने उरकण्यात येत असल्याची गावोगावी ओरड सुरू आहे. दर्जाहीन पद्धतीचे कामे उरकून जनतेच्या माथी मारले जात आहे. पाईपलाईन करण्यासाठी गावागावातील नव्याने बनविलेले रस्ते खोदून रस्त्याची वाट लावली आहे. शिरड येथील जलजीवन मिशनच्या त्या दर्जाहीन कामाची गुणवत्ता तपासून चौकशी करण्याची गरज आहे. संबंधितांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. शिरड भागात जलजीवन मिशनअंतर्गत चालू असलेली पाणीपुरवठा योजनेची कामे कासव गतीने मागील दोन वर्षांपासून सुरू आहे जलजीवन मिशनचे कामआणि अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहेत. अनेक गावात झालेली कामे अर्धवट अवस्थेतच आहेत.गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून पाईपलाईनची खोली कोठे इतभर तर कोठे एक फूटापेक्षा जास्त नसल्याची ओरड आहे. गावातील अंतर्गत रस्त्याची चाळणी झाली आहे. मजबुतीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्यामुळे गावाची शोभा वाढली होती. परंतु पाणी पुरवठा योजनेमुळे संपूर्ण रस्त्याची वाट लागली आहे.
किमान दोन वर्षांपासून चालू असलेल्या जलजिवन मिशनच्च्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा अजून थेंब कोणाच्याच घस्यात उतरला नाही. थातूरमातूर कामे उरकून घेतल्याने ही योजना लाईफ टाईम टिकेल, असे दिसत नाही. शासनाची झोळी रिकामी करून गुत्तेदारांची झोळी भरण्याचा सध्या तरी प्रकार चालू आहे. असे असतांनाही शासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी त्या कामाला भेट देत नाही. यामागचे 'गुढ' कायम असून कोठे तरी पाणी मुरते. दर्जाहीन कामात पुलाखालून बरेच पाणी वाहून जात आहे. अर्थातच गुणनियंत्रण विभागाकडून त्या कामाचा दर्जा तपासून कामाची चौकशी करून ठेकादाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी पुढे आली आहे.





Social Plugin