Ticker

6/recent/ticker-posts

इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुपच्या अध्यक्षपदी प्रा. कृष्णा मंडले यांची निवड



संदिप गावडे @  प्रतिनिधी 

         इस्लामपूर (ता. वाळवा जि. सांगली) येथील सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित अग्रेसर असलेल्या आविष्कार कल्चरल ग्रुपच्या अध्यक्षपदी जयंत वाचनालयाचे कार्यवाह कासेगावचे प्रा. कृष्णा मंडले यांची निवड करण्यात आली. 

          माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार कल्चरल ग्रुप गेल्या २३ वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. राज्यभर नावलौकिक असलेल्या या संस्थेने राज्य व देशातील ७५ हून अधिक दिग्गज कलाकारांच्या संगीत रजनी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. 

          आविष्कार कल्चरल ग्रुपचे मार्गदर्शक मोहनराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये भूषण शहा (इस्लामपूर) यांची कार्याध्यक्षपदी, राजेंद्र माळी (इस्लामपूर) उपाध्यक्षपदी तर विजय लाड (राजारामनगर) यांची सचिवपदी निवड झाली. तर सहसचिव विजय नायकल (नायकलवाडी), खजिनदार विश्वास कदम (मसुचीवाडी) यांची तसेच  नजीर शेख (माजी कार्याध्यक्ष), सुनिल चव्हाण (मावळते अध्यक्ष ), प्रा . प्रदीप पाटील (मावळते कार्याध्यक्ष), सतिश पाटील (माजी अध्यक्ष), विश्वनाथ पाटसुते (मावळते सचिव), लव्हाजी देसाई, विनायक यादव अशा  कार्यकारी समितीची पुढील ३ वर्षासाठी निवड करण्यात आली .

       यावेळी सचिनकाका पाटील, माजी संचालक डी. बी. पाटील , माजी सरपंच बाबुराव पाटील, सुजित पाटील, संजय पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील यांच्यासह सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.