*प्लास्टिक बंदीच्या कारवाईने खळबळ; यापुढेही कारवाई निरंतर सुरु राहणार – मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर*
शिंदखेडा( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
येथील नगरपंचायत १०० ते १५० किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या या बाबतची अधिक माहिती अशी कि, शिंदखेडा येथे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना शहरात सर्रासपणे बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. शहरात प्लास्टिक बंदी व्हावी याकरिता मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅनर व जाहीर दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली व त्यानंतर प्लास्टिक बंदी पथक तयार करून नगरपंचायतीकडून नियमित कारवाई करण्यात येत आहे.
प्लास्टिक बंदी पथकाकडून नियमित होत असलेल्या कारवाईने प्लास्टिक कॅरीबॅग विक्रेत्यांनी धास्ती घेतली असून शहरातील काही दुकानदारांनी प्लास्टिक बंदी असलेबाबतची फलक लावली आहेत. दि. ३० रोजी प्लास्टिक बंदी पथकाने कारवाई केली असता १०० ते १५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व ६२०० रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर मोहिमेत या मोहिमेचे पथक प्रमुख स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चौधरी, सह पथक प्रमुक कर निरीक्षक गणेश पवार, शहर समन्वयक रविंद्र पाटील, आकाश पवार, ज्ञानेश्वर पीठे महेंद्र सैंदाणे, अजय दोडावे, ज्ञानेश्वर बोरसे, सुमित माळी, दीपक जाधव आदी उपस्थित होते.
शहरातील सर्व दुकानदार, पथविक्रेते व नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, वस्तू वापरू नये. आढळून आल्यास नगरपंचायती द्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात येईल, व प्लास्टिक बंदी ची कारवाई नियमित सुरु राहील असा इशारा नगरपंच्यातीच्या वतीने देण्यात आला. तसेच नागरिकांनी कापडी पिशवी वापरावी याबाबत आवाहन करण्यात आले.
पुढील काळात प्लास्टिक विरोधी मोहीम आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील दुकानदार, व्यापारी,पथविक्रेते, नागरिक यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा. याचबरोबर शहराचे सौदर्य जे कोणी बिघडवण्याचे काम करेल त्यांच्यावर नगरपंचायतेच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. लवकरच आपल्याला शिंदखेडा शहर प्लास्टिक मुक्त करायचे आहे – श्रीकांत फागणेकर, मुख्याधिकारी शिंदखेडा*





Social Plugin