, २१ दुचाकी वाहनांसह ६.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
संदीप गावडे प्रतिनिधी
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) आणि भिलवडी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत सुदिप अशोक चौगुले ( वय ३७ , रा . पाटील गल्ली , भिलवडी , ता . पलूस ) या दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली. या चोरट्याकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी केलेल्या २१ चोरीच्या दुचाकीसह ६.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सांगली जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले. या पथकाला खबऱ्याद्वारे सांगलीवाडीतील कदमवाडी येथे दुचाकी विक्री करणारा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने ती माळवाडी येथून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर जिल्ह्यातील विविध शहरे , गावांमधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ९ दुचाकी जप्त करून त्याला अटक करून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी भिलवडी पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्याकडून चोरीच्या आणखी १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. एकूण २१ दुचाकी जप्त करण्यात आला असून सुमारे ६.६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे , भिलवडीचे सहायक निरीक्षक भगवान पालवे , उपनिरीक्षक कुमार पाटील , नागेश कांबळे , संदीप पाटील , अतुल माने , ऋतुराज होळकर , विनायक सुतार , गणेश शिंदे , कॅप्टन गुंडवाडे , विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.





Social Plugin