Ticker

6/recent/ticker-posts

तीर्थपुरी येथील पाच विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत यश..



अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पाच विद्यार्थ्यांनी सीए सारख्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश संपादन केले आहे. गुरुवारी (दि.२७) सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसह कुटुंबियांनी आनंद साजरा केला.

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) द्वारे नोव्हेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अंतिम परीक्षेत तीर्थपुरीतील पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तीर्थपुरी येथील ग्रामीण भागातील अनुजा अशोक तोष्णिवाल, प्रतीक्षा संजय तापडिया, तेजस किशोर मानधानी, रोहित संजय मानधानी, शिवराज सुनील बोबडे या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीने आपले स्वप्न पूर्ण केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.