Ticker

6/recent/ticker-posts

सईताई डहाके यांच्या विजयात शिंदे सेनेचा बहुमोल वाटा - मंगेश मुंदे


गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी 

मानोरा विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या सईताई डहाके बहुसंख्य मतांनी विजयी झाल्या. त्यांच्या विजयात शिवसेना शिंदे गटाचा बहुमोल वाटा आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष मंगेश पाटील मुंदे यांनी दिली महायुतीतर्फ भारतीय जनता पक्षाने सईताई डहाके यांना उमेदवारी दिली होती. शिंदे सेना महायुतीतील मित्र पक्ष आहे.

मित्रधर्म निभावताना शिवसेना शिंदे गटाने सईताई डहाके यांना विविध सर्कलमधून सर्वात जास्त आघाडी मिळवून दिली. तसेचभाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र गोलेछा यांनी त्यांच्या जुन्या समर्थकांना घेवून मतदार संघात मेहनत घेतली.

मतदार संघात गोलेछा यांना मानणारे असंख्य मतदार जास्त असून त्यांनी शिंदे गटाला सोबत घेत महायुतीचा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी असा निवडून येईल ? याकडे लक्ष दिले. त्यांच्यासोबत भाजपचे माजी तालुका अध्यक्ष गजानन पाटील खोडे, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, शिवसेना, भाजप व स्व. प्रकाश डहाके यांचे समर्थक होते.