Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा दबून मृत्यू ..

प्रतिनिधी.मयूर वाव्हळ 

अंबड कर्जतहून लोणार भायगावकडे जाणारा एक भरधाव ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात ट्रॅक्टर चालक युवकाचा दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २) दुपारी अडीचच्या सुमारास कर्जत (ता. अंबड) शिवारातील शेंडगे तांडा येथे घडली. आदित्य भगवान उन्हाळे (वय २० वर्षे रा. आवा अंतरवाला ता. अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

आदित्य हा ट्रॅक्टरमध्ये भरती घेऊन ते खाली करुन परत चालला असताना कर्जत गाव शिवारातील शेंडगे तांडा येथे अंदाज न आल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली जाऊन खड्डूयात जाऊन उलटला. यात चालक आदित्य उन्हाळे हा ट्रॅक्टर खाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत आदित्य याच्या पश्चात आईवडील व बहीण, असा परिवार आहे.