*निवृत्ती नव्हे तर जिवनाची नवीन आवृत्ती होय बैसाणे यांचे प्रतिपादन*
शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
शिंदखेडा येथील जनता विदयाप्रसारक संस्थेच्या जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सिमा शशिकांत बैसाणे यांच्या 39 वर्ष सेवा करून सेवानिवृत्ती झाल्यानंतर सेवापुर्ती कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संचालक मंडळासह आप्तेष्ट नातेवाईक शिंदखेडा व वायपूर येथील कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला
संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ संचालक गोरख राघो पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते हयावेळी संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील सचिव मीरा मनोहर पाटील देवेंद्र पोपटराव बोरसे प्रा जितेंद्र पाटील माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील गटशिक्षणाधिकारी डॉ. सी के पाटील गट समन्वयक सी जी बोरसे माझी प्राचार्या एम डी बोरसे, प्रा आर के पवार आर एच भामरे पर्यवेक्षक यु पी देसले, उत्सव समिती प्रमुख एस ए पाटील वरीष्ठ लिपीक किशोर पाटील यांच्यासह शशिकांत बैसाणे, अरुण बैसाणे, सुषमा बैसाणे, अनिल बैसाणे, सुनिता बैसाणे, अनिकेत बैसाणे, सोनाली बैसाणे, अमेय बैसाणे प्रियंका बैसाणे, जावई सुजित महिरे तन्वी महिरे, अजय तिजोरे वृषाली तिजोरे दिपक पवार सायली पवार, मुलगा अदित्य बैसाणे, अक्षय बैसाणे सह नातलग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
त्यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमती एस एस बैसाणे यांनी आपल्या 39 वर्षे सेवा केलेल्या कार्यकाळात अनेक आठवणींना उजाळा दिला प्रामाणिक सेवा केल्याच्या दाखला देत सेवानिवृत्ती नव्हे तर जीवनाची नवे आवृत्ती आता सुरू झाली आहे असेही गौरवोद्वार काढले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता विद्या प्रसारक संस्थेचे जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्राथमिक विद्यामंदिर यांच्या सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी परिश्रम घेतले





Social Plugin