Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उमरखेड शहर महिला प्रमुखपदी सपना चौधरी यांची निवड



बाळासाहेब पवार प्रतिनिधी उमरखेड

उमरखेड येथील सपना चौधरी ह्या अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर राहून उमरखेड शहरातील महिलांच्या अडिअडचणी समजून घेत सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. तसेच शहरातील महिलांच्या न्याय हक्कासाठी झटत असतात. सपना चौधरी यांच्या कार्याची दखल घेत जेष्ठ शिवसैनिक पदाधिकारी यांनी शिवसेना उमरखेड शहर महिला प्रमुख पदी एकमताने निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. 

त्यावेळी सपना चौधरी यांनी महिलांना स्वावलंबी करण्याकरिता तसेच महिला सक्षमीकरण साठी सातत्याने प्रयत्न करीन व शिवसेना पक्ष वाढी करिता अग्रेसर राहील माझ्यावर शिव सैनिक यांनी विश्वास दाखऊन माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी पार पाडण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करीन असा विश्वास दिला. त्यावेळी सपना चौधरी यांचे समवेत वर्षा वानखेडे व संगिता धाबे उपस्थित होत्या. तसेच उमरखेड शहर प्रमुख ॲड . संजीव कुमार जाधव, यवतमाळ जिल्हा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम, शिवसेना तालुका प्रमुख प्रविण पाटील मिराशे , जेष्ठ शिवसैनिक रविकांत रूडे , संदिप ठाकरे , कैलास कदम , अनंतराव अमृते (बालयोगी) , ॲड . अजय पाईकराव , बसवेश्वर क्षिरसागर , कृष्णा हिंगमीरे , विनायक मरडकर , कपिल चव्हाण , छोटू शर्मा , दामोदर इंगोले , अमोल सुर्यवंशी आदि शिवसैनिक उपस्थित होते.