Ticker

6/recent/ticker-posts

ऊस दर जाहीर न झाल्यास ऊस वाहतूक रोखणार स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक



प्रतिनिधी  शौकत शेख 

शेवगाव-  गेल्या दीड महिना ऊस गळीत हंगाम चालू झाला असून अद्याप तालुक्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही सर्व उत्पादक शेतकरी ऊस भावाच्या प्रतीक्षेत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेची आचारसंहिता संपल्यापासून ऊस घराच्या मागणीसाठी प्रयत्न करत आहेत तहसीलदार प्रादेशिक सहसंचालक जिल्हाधिकारी साहेब कारखाना दार यांच्यासोबत बायका जवळ सुद्धा ऊस दराचा तिढा सुटला नाही त्यामुळे सर्व शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त आहे या भावनेतून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्त गुरुवार 2 जानेवारी रोजी एक दिवसाचे लक्षणे उपोषण करणार आहे .

या उपोषणात ज्या कारखानदाराने 3100 भाव देणार नाही त्या कारखान्याची शुक्रवारी दिनांक 3 जानेवारीपासून तोडणी बंद करून वाहने अडविनेत येतील असा इशारा दिला आहे यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना त्रिव स्वरूपाचे आहेत यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे तालुका उपाध्यक्ष अशोक भोसले तालुका पक्षाध्यक्ष प्रशांत भारत पाथर्डी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गरजे शहराध्यक्ष अमोल देवडे युवा अध्यक्ष हरिभाऊ कबाडे दादासाहेब पाचरणे विकास साबळे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विनोद शेळके उपाध्यक्ष शिवाजी बडे मेजर उपस्थित होते.