मालेगाव-वाशीम प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
वाशिम ; गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसद येथील पिएचडी सेंटर चे रिसर्च स्कॉलर प्रा. पंढरी गोरे ( श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम ) यांनी यवतमाळ जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानानंतर विद्यापीठस्तरीय दिनांक 23 आणि 24 डिसेंबर या कालावधीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील अविष्कार- 2024 स्पर्धेमध्ये पोस्ट पीपीजी प्रकारात मानवविद्या कला व भाषा या वर्गवारीत प्रथम पुरस्काराने सन्मानित झालेत. या सोबतच ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेत. राज्यस्तरावर ते अमरावती विद्यापीठाच्या अविस्कार टीमचे सहभागी म्हणून प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांनी सीएसआर आणि कृषी सक्षमिकरन या विषयावर आपले सादरीकरण केले. कृषी क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सिएसआर फंड कशी महत्वाची भूमिका पार पाडू शकते हे त्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडले. प्रथम क्रमांक (कलर कोड ) मिळाल्याबद्दल गुलाम नबी आझाद येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य व अविस्कार स्पर्धेचे मार्गदर्शक डॉ. भालचंद्र देशमुख तथा संशोधन केंद्र प्रमुख डॉ राजेश काळे व पीचडी मार्गदर्शक डॉ. विवेक सिरस्कार यांनी अभिनंदन केले. गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Social Plugin