मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
मेडशी :दि 26 डिसें.
स्व. सुशीलाबाई देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा काळकामठा येथे अपार आयडी व यु-डायस प्लस नवभारत साक्षर उल्हास कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज डोंगरदिवे माध्यमिक मुख्याध्यापक व प्रमुख पाहुणे मेडशी केंद्राचे केंद्रप्रमुख आत्माराम सोनोने व गोसावी सर रामू कदम प्राथमिक मुख्याध्यापक होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर,व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मेडशी केंद्राचे केंद्रप्रमुख आत्माराम सोनोने यांनी अपर आयडी यु-डायस प्लस नवभारत साक्षर उल्हास यांच्या बद्दल मार्गदर्शन केले
तसेच गोसावी सर यांनी अपार आयडी यु-डायस प्लस नवभारत साक्षर उल्हास मध्ये येणाऱ्या अडचणी ना शिक्षकांना कसे सामोरे जावे लागते याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज डोंगरदिवे माध्यमिक मुख्याध्यापक आदिवासी आश्रम शाळा काळाकामठा यांनी आपल्या भाषणात आदिवासी विद्यार्थी व पालक यांच्या संगनमताने आम्हाला अपार आयडी यु-डायस प्लस नवभारत साक्षर उल्हास साठी बऱ्याच अडचणी येत असून ते अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहो असे सांगितले. या कार्यक्रमामध्ये मेडशी केंद्रातील सर्व शाळा व जिल्हा परिषद शाळा मधील सर्व शिक्षक वर्ग.जगन्नाथ डोळे सर.अरविंद मांजरे सर.सोनाजी झळके सर. काशिनाथ तिकोडे सर. गणेश चव्हाण सर. गुलवाडे मॅडम. गुडदे सर. मुंढे मॅडम. विटकरी मॅडम. कैलास बोरचाटे सर. खडसे सर. श्रीनाथ मॅडम इत्यादी शिक्षकांची उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप घाटोळ सर यांनी केले तर रोहित पाठक सर यांनी आभार व्यक्त केले.





Social Plugin