Ticker

6/recent/ticker-posts

पतंग उत्सव साजरा करत असताना पक्षांची व मानवी जीवित हानी लक्षातघेत नायलॉन मांजाचा वापर करने टाळावे



"राजा प्रसेनजित संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा यांचे जनतेला आवाहन"


मालेगाव- प्रतिनिधी  जावेद धन्नू भवानीवाले 


वाशिम ; दि.26, डिसेंबर 2024, रोजी, राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहुउद्देश्य मंडळ केकतउमरा यांच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात येते की मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये पतंग उत्सव साजरा करत असताना नायलॉन मांजाचा वापर न करता घरगुती मांजाचा वापर करावा.. संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. पण अलीकडे हा खेळ जीवघेणा ठरत आहे. पूर्वी पतंग उडवण्यासाठी दोऱ्याचा किंवा घरगुती मांजाचा वापर केला जायचा. आता मात्र पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा (Nylon Manja) वापर केला जात असल्याने पक्ष्यांबरोबरच मानवी जीवनावरदेखील यामुळे संक्रांत येत आहे. पतंग काटाकाटीच्या खेळात दरवर्षी शेकडो पक्षी बळी पडत असून, नागरिक देखील गंभीर जखमी होत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

अनेक बेजबाबदार पतंग विक्रेते नायलॉन मांजा विकत आहेत. त्यामुळे या भागात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पशु-पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थापक अध्यक्ष राजा प्रसेनजित अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था केकतउमरा प्रविण पट्टेबहादुर, अखिल भारतीय सर्व प्राणी मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष प्राणी व सर्प मिञ विजयराज पाटील, नेहरु युवा बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष सर्प व प्राणीमित्र प्रदिप पट्टेबाहदुर, सर्पमिञ ओम पाटील, सर्पमिञ बाळू ढोके, सर्पमिञ विष्णू पायघन यांनी केले आहे.

मकरसंक्रांत या गोडवा निर्माण करणाऱ्या सणाला काहीसे कडवट रूप प्राप्त होत आहे. नायलॉन मांजामुळे आतापर्यंत शेकडो पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहेे. महाराष्ट्र मध्ये अनेक विदेशी पक्षी हे विविध भागांमध्ये येतात. नायलॉन मांजा या पक्ष्यांच्या जीवावर उठत आहे. हा मांजा कुजत किंवा नष्ट होत नसल्याने, वर्षानुवर्षे या मांजाचे दुष्परिणाम पक्ष्यांना भोगावे लागत - *विजयराज पाटील - (सर्प व प्राणीमित्र ) संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सर्प मिञ संघटना* 

केवळ पक्षीच नाहीत तर मानवी जीवनासाठीदेखील हा मांजा घातक ठरत आहे. या मांजामुळे आतापर्यंत अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. काहींना तर मांजामुळे कायमचे अपंगत्व आले आहे. तर काहींचा जीवही गेला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, मांजावर बंदी आणली गेली असली तरी, त्याचा सर्रासपणे वापर केला जात प्रकार थांबला गेला पाहिजे *- सर्पतज्ञ डॉ.संजय नाकाडे एम.बी.बी.एस एम.डी*