सकल मराठा समाज बांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ तसेच परभणी येथील पोलीस अत्याचारात मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मालेगाव येथे 2 जानेवारी गुरुवार रोजी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे . या मोर्चाला मालेगाव तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
मानवतेला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही हत्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे . शिव शाहू फुले आंबेडकरांनी दिलेल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडल्याने या घटनांसाठी जबाबदार असलेल्या नराधमांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे . या नराधमांना त्वरित अटक करून व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवून त्वरित फासावर चढविण्यात यावे . तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या राक्षसांची संपत्ती जप्त करण्यात यावी . या घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांपैकी एकाला सरकारी नोकरी व २५ लाख रुपये रोख देण्यात यावेत . या प्रमुख मागण्यांसाठी मालेगांव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने २ जानेवारी गुरुवार रोजी सकाळी १o वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . हा मोर्चा मालेगांव पोलीस स्टेशन समोरून निघुन विवेक ऑटोमोबाईल समोरून सिव्हील लाईन मार्गे , जिनशक्ती हार्डवेअर व आठवडी बाजार मार्गे तहसील कार्यालयावर जाणार आहे . तेथे मा. तहसीलदार साहेब मालेगांव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून या मोर्चात हजारोंच्या संखेने सहभागी व्हावे .असे आवाहन आयोजकांनी केले आहे .





Social Plugin