अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ
अंबड दि ३० (प्रतिनिधी):- आज महसूल विभागाची दोन ठिकाणी विविध पथक मार्फत गोदापत्रात अवैध गौण खनिज करणारे वाहतूक वाहना विरुद्ध कार्यवाही उपविभागीय दंडाधिकारी पुलकित सिंग व तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही तालुक्यातील संयुक्त पथकाने सकाळी रेती वाहतूक करणारे हायवा पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आले नंतर तसेच गोदापात्रात जाऊन धडाकेबाज कारवाई केली. त्यानंतर गोंदी परिसरात दोन वेळ रेती उत्खनन करण्याकरता असलेले केणी सह ट्रॅक्टर पकडण्यात आले उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः बोटीमध्ये प्रवास करून अंबड तालुका तसेच गेवराई तालुक्याच्या मध्ये असलेल्या नदीतील सर्व केली बांधण्याकरता वापरत असणाऱ्या दोरी कापून उध्वस्त केले.
त्याचवेळी गोरी गांधारी या ठिकाणी तहसीलदार विजय चव्हाण व त्यांच्या पथकातील सदस्यांनी मोजे गौरी गांधारी परिसरात असलेले केणी करता बांधण्यात आलेल्या दोऱ्या कापण्यात आल्या त्यापैकी काही दोऱ्या जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या त्याचबरोबर तेथील न उचलता येणाऱ्या दोऱ्या त्या ठिकाणी आग लावून भस्म करण्यात आले सदर परिसरात शोध घेतला असता दोन केण्यास सापडून आल्या सदरील दोन केण्यात जप्त करण्यात आले आहे सदरील कार्यवाही उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार श्री विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कार्यवाही म ध्ये विविध मंडळ अधिकारी तलाठी तहसीलदार व नायब तहसीलदार समाविष्ट होते.
.jpeg)




Social Plugin