मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ; ग्राम .खिर्डा ता मालेगांव येथे 25 डिसेंबर रोजी, सायंकाळी 7:00 वाजता मनुस्मृति दहन करण्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बौद्ध उपासक उपाशी का नागरिकांनी मनुस्मृति प्रत-प्रतिमेचे सामूहिक अगणी लावून दहन केले.२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २५ डिसेंबरला 'मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाड सत्याग्रह नंतर मनुस्मृती दहन केले गेले होते.
स्त्रियांविषयी आणि शुद्रांविषयी मनुस्मृतीत अनेक अपमानास्पद आणि भेदभावाची वादग्रस्त वचने आढळून आलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने महिला आणि मागासवर्गीय समुहाद्वारे मनुस्मृतीवर टीका केला जाते. मनुस्मृतीमुळे समाजात विषमतेचा पाया रचला गेला, अशी अनेक लोकांची समजूत आहे.20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मजकुराच्या उल्लेखनीय भारतीय समीक्षकांमध्ये बीआर आंबेडकर होते, ज्यांनी मनुस्मृतीला भारतातील जातिव्यवस्थेसाठी जबाबदार धरले. याचा निषेध म्हणून आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले .मनोगत पवन सदार यांनी केले. या वेळी उपस्थित धोंडू गवई,संदेश वैद्य ,प्रशिक वैद्य ,बालाराम खिल्लारे ,राजु गवई ,छोटूभाऊ गवई ,आकाश खिल्लारे, सचिन कांबळे ,पवन खिल्लारे ,निखिल वैद्य ,रितेश सरकटे ,इंदूबाई गवई ,गोदावरी वैद्य, सरोदया वैद्य ,ताराबाई वैद्य, गंगा वैद्य ,बेबी डोंगरदिवे ,मोनिका सदार ,अर्पना वैद्य, अनिशा गवई यांचा सह आदीची उपस्थिती होती .





Social Plugin