बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
जागतीक मृदा दिनानिमित्त कृषि विज्ञान केंद्र कालवडे येथे शेतकरी मेळावा व मृद आरोग्य पत्रिकेचे वाटप करणेत आले.
यावेळी श्री समीर पवार उपविभागीय कृषि अधिकारी कराड, डॉ. सुदर्शन शेट्टी सहाय्यक निदेशक केंद्रीय कुक्कुट पालन संस्था मुंबई, डॉ. भरत खांडेकर वरिष्ठ शास्त्रज्ञ् व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र कालवडे,श्री दत्तात्रय खरात तालुका कृषि अधिकारी कराड, श्री विठ्ठल बांबळे तालुका कृषि अधिकारी पाटण, श्री नीरज बोडके कृषि अधिकारी पाटण, सौ रजनी शिंदे कृषि सहाय्यक कराड उपस्थित होते.
तसेच कृषि विज्ञान केंद्र कालवडे मधील सर्व स्टाफ उपस्थित होता.यावेळी कराड व पाटण तालुक्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप करणेत आले केंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या माती परीक्षण सोयीचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा व आपल्या जमिनीचे आरोग्य संभाळावे तसेच शासनाच्या विविध योजनाचा देखील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी करण्यात आले.





Social Plugin