Ticker

6/recent/ticker-posts

अनुदानासाठी ७ हजार शेतकऱ्यांनी केवायसी करा - तहसीलदार चव्हाण



अंबड तालुका प्रतिनिधी 

अंबड दि ३० (प्रतिनिधी) : अंबड तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील ७ हजार ४० शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर जमा करण्यासाठी व्ही के नंबर घेऊन केवायसी करावे करून घ्या यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे असे आवाहन अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडून शेतकऱ्यांना कळविण्यात येत आहे. अंबड तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने बारा गावातील सात हजार चाळीस खातेदार यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेले आहेत तरी सदर बारा गावच्या शेतकऱ्यांनी श केवायसी करून तघ नंबर प्राप्त करून घ्यावे व्हीके नंबर प्राप्त झाल्या नंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहे. करिता बारा गावच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आली आहे 

करता संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक डिटेल्स व इतर माहिती यांची ई केवायसी करून तात्काळ अनुदान उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार श्री विजय चव्हाण यांच्याकडून करण्यात येत आहे. कोरड तेरा हजार रुपये मदत आहे पण हेक्टरी प्रमाणे ८० टक्के मदत मिळणार आहे. जून ते ऑक्टोबर, २०२४ माहे ऑगष्ट व सप्टें या कालावधीत अंबड तालुक्यात अतिवृष्टी/पुर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी प्राप्त याद्यागावाचे नाव १दहिगव्हाणखु २ पांगरी ३ वाळकेश्वर ४ ढालसखेडा ५ पाथरवाला बु.६ करण७ बोरी ८ सारगपूर९ किनगाव १० गंगारामवाडी ११ सुखापुरी १२ देशगव्हाण या बारा गावानंतर इतर लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या गावाचा समावेश करण्यात येईल असे मंडळ अधिकारी तलाठी यांच्याकडून सांगितल्या जात आहेत.