बाळापुर
तालुक्यातील बाळापूर शहरात नदीत खासगी बस क्रमांक एम एच 37 बी 4999 क्रमांकाचे बस कोसळली खासगी बस मध्ये ३० ते ४० प्रवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर बाहेर काढण्यात आल्याची माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे. यात कुठलीही जीवित हानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आली आहे. भुसावळवरून वाशिमला जाणारी खासगी बस आज सायंकाळी ७ च्या सुमारास बाळापुर शहरातून जात असताना भिकुंड नदीत कोसळली. बस कोसळतात गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. सदर नदीच्या पुलाला कथळे नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले. या पुलावर आठवड्या बसवण्याची मागणी बाळापूर शहरातील नागरिकांनी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.





Social Plugin