Ticker

6/recent/ticker-posts

कठीण परिस्थितीशी झुंज देऊन उंच आकाशी झेप घेणारे गणेश रमेश करवते



 मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

 जीवन हे एक संघर्ष आहे. जीवनामध्ये सुख दुःख गरीबी व हलाखीचे जीवन जगून जीवनामध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनेला जो धर्याने समोर जातो. कुठल्याही प्रसंगामध्ये कसल्याही संकटाला न घाबरता फक्त डोळ्यापुढे आपला लक्ष ठेवून विविध प्रकारच्या अनेक संकटाला तोंड देऊ खंबीरपणे उभा राहून जो खूप कष्टाने व चिकाटीने अहो रात्र स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतो. 

त्याला एक दिवस तरी त्याचा मेहनतीचे फळ जरूर मिळतो. याचेच एक उदाहरण म्हणजे मेडशी येतील गणेश रमेश करवते या मुलांने आपली जिद्द मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर परिश्रम घेऊन स्वतःच्या स्वप्नाला पंख देऊन एक सुंदर झेप घेतली त्याने आपले व आपल्या गरीब कुटुंबाचे जीवन बदलून टाकण्याचा एक सुंदर प्रयत्न करून यश प्राप्त केले त्याला कारण असे की गरिब हलकीचे जीवन जगत असताना कठीण परिस्थितीला तोंड देऊन जिद्द मेहनत व शिक्षणाच्या बळावर गणेश रमेश करवते यांनी सीआयएसएफ मध्ये नियुक्ती प्राप्त करून यशाचे शिखर गाठले 

त्याच्या या यशाचे नातेवाईक, मित्रमंडळी, मध्ये सगळीकडे कौतुक होत आहे  नव्याने सीआयएसएफ मध्ये नियुक्ती झालेल्या मेडशी येथील गणेश रमेश करवते या मुलाचा आनंद दोहगुणी करून आनंदोत्सव म्हणूनमाजी उपसरपंच सौ सुनीता घनश्याम साठे यांच्या द्वारकामाई या निवास स्थानी साठे परिवारातर्फे पुष्पहार घालून मुखात गोड पेढ्यांचा घास ठेवून गणेश रमेश करवते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित माजी. उपसरपंच सौ सुनीता घनश्याम साठे, घनश्याम साठे (महसूल विभाग) मुलगा अनुराग साठे यांनी सहपरिवार नवनियुक्त सीआयएसएफ गणेश रमेश करवते याचा सत्कार करून कौतुक केले.