Ticker

6/recent/ticker-posts

आकांक्षित मालेगाव तालुक्यात बायफद्वारा सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पाचा शुभारंभ


मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


   मालेगाव - नीति आयोगाच्या निकषांनुसार मालेगाव तालुक्याची आकांक्षीत तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे. आकांक्षीत तालुक्यात एच.डी.एफ.सी.बँक पुरस्कृत बायफद्वारा सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.  या कार्यक्रमा अंतर्गत अंतर्गत आरोग्य,पोषण,कृषी व कृषी संलग्न घटक,मूलभूत पायाभूत सुविधा आदी पाच प्रमुख घटकांतर्गत एकूण 39 निदेशांक सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या उद्दिष्टासाठी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या सहकार्याने विविध संस्था कार्यरत आहेत.    

    एच.डी.एफ.सी.बँक पुरस्कृत बायफद्वारे संचालित सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा कृषी महाविद्यालय, आमखेडा येथे जिल्हाधिकारी एस.बुवनेश्वरी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर येथील बायफचे बाह्य अतिरिक्त मुख्य कार्यक्रम अधिकारी शैलेश भगत यांनी केले 12 गावांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला.या प्रकल्पांतर्गत मालेगाव तालुक्यातील 12 गावांची निवड करण्यात आली असून,यामध्ये मसाला खुर्द,आमखेडा,पिंपळा, बोरगाव,दुबळवेल,जामखेड,उमरदरी,गिव्हा कुटे,पांगरी धनकुटे, कवरदरी,वाडी रामराव व पिंपळसेंडा या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये कृषी विकास,आरोग्य सुधारणा,स्मार्ट शाळा,बचत गट बळकटीकरण,भूमिहीनांना लाभ मिळवून देणे आणि वंचित घटकांना प्रवाहात आणणे यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन उद्घाटन सोहळ्यादरम्यान जिल्हाधिकारी सौ.एस.बुवनेश्वरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून आपला माल अधिक किमतीत विक्री करण्याचा सल्ला दिला मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ घेऊन रब्बी व उन्हाळी हंगामात बहुफळ पीक पद्धतीचा अवलंब करावा,असे मार्गदर्शन त्यांनी केले. 

"आकांक्षित जिल्हा Inspirational बनवण्याचा निर्धार करूया," असे त्यांनी ठामपणे सांगितले उपस्थित मान्यवर आणि विशेष आकर्षण कार्यक्रमास जिल्हा कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा,मालेगाव तहसीलदार दीपक पुंडे,वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.एल.काळे (के.व्ही.के.,वाशीम),वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पि.पी.शेळके (के.व्ही.के.,तोंडापूर) तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर,पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष गिरी,जीवोन्नती अभियान तालुका समन्वयक विनोद कराळे,आकांक्षित तालुका सहकारी भूषण तायडे,एच.डी.एफ.सी.बँकेच्या वेस्ट झोन प्रोजेक्ट लिडर सुजया शेट्टी,बायफचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे (नाशिक),प्रकल्प व्यवस्थापक पवन डोंगरे (एच.डी.एफ.सी.बँक सी.एस.आर.), अतिरिक्त मुख्य कार्यक्रम अधिकारी शैलेश भगत (बायफ,नागपूर) आणि अविनाश माणिकराव जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते

 ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमाला मसाला खुर्द,आमखेडा,पिंपळा,बोरगाव,दुबळवेल,जामखेड,उमरदरी, गिव्हा कुटे,पांगरी धनकुटे, कवरदरी,वाडी रामराव व पिंपळसेंडा या गावांतील गाव विकास समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय,बचत गटातील महिला उपस्थित होत्या कृषी क्षेत्रातील प्रदर्शन विशेष आकर्षण कृषी महाविद्यालय,आमखेडा येथील विद्यार्थ्यांनी कृषी निविष्ठा मालाचे प्रदर्शन भरवले होते या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बायफच्या सी.आर.पी.टीममधील आकाश सनिसे, डी.के.भगत, नारायण तावडे,विलास राऊत,अलिशा जेठवानी (वाशिम ) यांनी विशेष सहकार्य केले आभार प्रदर्शन डी.के. मनवर यांनी केले या सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पामुळे मालेगाव तालुक्यातील 12 गावांचा आर्थिक व सामाजिक विकास गतीमान होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.