अंबड/प्रतिनिधी मयुर वाव्हळ
अंबड शहरासत तालुक्यात आठवड्यापासून सतत बदलणाऱ्या वातावरणासह थंडीमुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. लहान मुले अधिक आजारी पडत आहेत. सध्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, अपचनाचा त्रास, हातपाय दुखणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. काहींचा ताप पाच ते सहा दिवस राहत असल्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे व्यायामासह योग्य आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
अंबड तालुक्यात सर्वत्र शीतलहर जानवत आहे. सकाळी आणि सायंकाळी गारवा वाढत असल्याने आजार बळावत आहेत. विशेषतः रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दररोज ओपीडीमध्ये दहाच्या आसपास रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाच्या आजरांचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पालेभाज्या, मांसाहार तसेच हिंग, धने, जिरे, तेजपत्ता यांसारख्या
मसाल्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन वाढवावे, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्या जाणवत आहेत. वातावरणाच्या बदलामुळे गेल्या काही दिवसात सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सद्यपरिस्थितीत सर्दी ताप खोकला याचे रुग्ण सर्वाधिक आहेत. त्यासाठी पाणी उकळून कोमट करून पिणे, आजारी असल्यास घरातच राहणे जेणे करून घरात तापाची साथ पसरणार नाही.





Social Plugin