कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
दि. 08 डिसेंबर 2024 रोजी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने पालकांना साठी पालक मेळाव्याचे आयोजन जालना येथे आंबेकर सभागृहा येथे आयोजित करण्यात आले होता. या पालक मेळाव्यात प्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. या पालक मेळाव्याचे सुञ संचालन कैलास कोल्हे यांनी केले.
या पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जालना विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. जोमा मस्ती हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बदनापुर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. परमेश्वर नाईकवडे, अॅड. बाळासाहेब डाके तसेच कवी दिनेश शेळके उपस्थित होते.
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहे. मुलांचा सर्वागिण विकास व्हावा या साठी 2008 पासुन जालना जिल्ह्यात मंठा, जालना, बदनापुर व परतूर या ठिकाणी काम करते आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पालकांना साठी ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, म्हणून बदनापुर व भाटेपुरी येथील पालकांनचा पालक मेळावा जालना या घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच एक दिवस बहरण्याचा ही थीम समोर ठेवून पालकांना साठी वेगवेगळे खेळ घेण्यात आले व त्या मध्ये विजेते पालकांना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे देण्यात आली. या पालक मेळाव्या मध्ये पालकांनी खुप चांगल्या पद्धतीने विविध खेळामध्ये सहभागी होऊ आनंद घेतला. या पालक मेळाव्याचे प्रसंगी या संस्थेचे आनंदो प्लस प्रकल्पाचे जालना येथील समन्वयक जगदिश सातपुते, कैलास कोल्हे, शिवाजी काजळकर, अमोल गोंडगे, नवनाथ कावळे, प्रभाकर कराळे हे उपस्थित होते, तसेच मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.





Social Plugin