प्रतिनिधी - शौकत शेख
बोधेगाव- आपल्या स्वतःच्या परिस्थिती वर मात करून कष्ट आणि संघर्षातून शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील भूमिपुत्र प्रदीप भास्कर घुमरे यांचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे दरवर्षी स्टाफ सिलेक्शन मार्फत (ncc) मार्फत वेगवेगळ्या भरती परीक्षा घेतल्या जातात स्टाफ सिलेक्शन मार्फत झालेल्या परीक्षांमध्ये (cisf)(GD) या पदासाठी 160 गुणा पैकी 152 गुण मिळवून प्रदीपने आपले यश मिळवले सदरील परीक्षा पुणे रामटेकडी ठिकाणी झाली होती प्रदीप चे शिक्षण हे प्रार्थमिक जिल्हा परिषद शाळा घुमरे वस्ती तर प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल माध्यमिक विद्यालय बोधेगाव तालुका शेवगाव या ठिकाणी पूर्ण झाले होते श्री शिवाजी जूनियर कॉलेजचे श्री पालवे सर. श्री पोटफोडे सर. श्री मोरे सर या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले त्यांचे सार्थ निवडीबद्दल लाड जळगाव चे सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य लाडजळगाव. गावकरी मंडळी नातेवाईक मंडळी. मित्र मंडळ. यांनी खूप खूप अभिनंदन केले आहे आपल्या यशामध्ये आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे असे प्रदीप ने म्हटले आहे प्रदीपचे परिसरातून खूप खूप कौतुक होत असून महाराष्ट्र ग्रामीण न्युज यांच्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे





Social Plugin