Ticker

6/recent/ticker-posts

21 फुटाची विजयस्तंभाची प्रतिकृती



सावळी इचोरा परिसरातील युवकांचा अभिनंदनिय उपक्रम सामाजिक ऐक्य, समाज प्रबोधन,शौर्य दिनाच्या शहिदांना अभिवादन सावळी इचोरा परिसरातील युवकांचा स्तुत्य उपक्रम.आज दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या 207 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ 21 फुटी विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून शौर्य दीन साजरा केला.या निमित्त विशेष वृत्त असे की सावळी इचोरा परिसरातील युवकांनी सदर गावातली 18 गावामध्ये सतत अहोरात्र 18 दिवस परिश्रम करून सर्व समाजबांधवांना आपसातील सर्व मतभेद विसरून एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न केला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणुन आपण शिकवा, चेतवा, संघटित करा हा निर्देश प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे हाच त्या युवकांचा प्रामाणिक उद्देश अधेरेखित होत होता.

सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन हे अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने करुन युवकांनी नविन पायंडा पाडल्याचाप्रयत्न केला. सकाळी 11 वाजता धम्म ध्वजाचे ध्वजारोहण, धम्म ज्योत बुद्धविहार सावळी सदोबा येथे करण्यात आले त्यानंतर शौर्य दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त अभिवादन तथा मानवंदना रॅलीचे अयोजन धम्मज्योत बुद्धविहार सावळी स ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत 11:30 ते 12 च्या दरम्यान करण्यात आले सदर अभिवादन रॅलीचे पथसंचलन भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल आर्णीचे अध्यक्ष आयु.नागोरावजी बन्सोड यांनी केले या अभिवादन मार्च मध्ये समता सैनिक दल आर्णी, घाटंजी, पांढरकवडा यांनी सहभाग नोंदविला.बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभारलेल्या 21 फुटी विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला समता सैनिक दल आणि परिसरातील नागरिकांनी मानवंदना आणि त्रिशरन,पण पंचशील देऊन कृतघ्णता व्यक्त केली.

नंतर 12 वाजता समस्त उपस्थीत परिसरातील नागरिकांना धम्मज्योत बुद्धविहार सावळी येथे भोजनदान करण्यात आले.

प्रबोधनपर प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात 1 वाजता उपस्थित पाहुण्याच्या स्वागतानी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्मधर आयु ऍड अप्पाराव मैंद साहेब (संस्थापक अध्यक्ष दी पुसद अर्बन बँक 10 पुस्तकाचे लेखक), उद्घाटक आयु प्रा उत्तम शेंडे (घाटंजी), प्रमुख वक्ते आयु किशोर जी नगारे (राज्य प्रचारक बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महाराष्ट्र), प्रमुख पाहुणे अण्णासाहेब मून साहेब पांढरकवडा,मामीडवार सर पुसद (बौध्द प्रचारक), परमेश्वर भरने(भा. बौ. म), हेमंत बोरकर (समता सैनिक दल उपअध्यक्ष), आयु महादेव लंबे संस्थापक संयोजक गाव तिथे वाचनालय, पे बॅक टू सोसायटी, संविधान).

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपेशजी खरतडे तर प्रास्ताविक भुवन मूनेश्र्वर यांनी केले तर आभार प्रदर्शन साहेबराव पूनवटकर यांनी मानले.

उपरोक्त प्रबोधनपर कार्यक्रमामध्ये बौध्द समाज बांधव, भगिनी शेकडोच्या संख्येनी उपस्थित होते, परिसरातील नवयुवकांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजनात अथक परिश्रम घेतले तथा समाजात ऐक्य घडवून आणले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाची सुरुवात गाव तिथे वाचनालय, संविधान, पे बॅक टू सोसायटी , भारतीय संविधाान जागृती या त्रिसुत्री अभियानाचे संस्थापक संयोजक महादेव लम्बे यांनी अप्पाराव मैंद यांच्या मार्फत संविधानाची प्रत भेट देऊन केली तथा प्रत्येक बुद्धविहारात निर्माण होऊन ते चळवळीचे केंद्र झाले पाहिजे याचे महत्व सांगितले, आयु उत्तमराव शेंडे यांनी तथागत बुद्ध ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान बहाल करण्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास थोडक्यात सांगितला, सोबतच जो समाज आपला इतिहास विसरतात तो समाज इतिहास घडवू शकत नाही असे सांगितले.

आयु किशोर नगारे यांनीएससी, एसटी, ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजातील सर्वांना एकत्र करुन बहुजन हिताय बहुजन सुखाय ही तथागत बुद्ध, बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नातील प्रबुद्ध भारताची संकल्पना प्रत्यक्ष साकार करू शकतो हे आपल्या धडाकेबाज वाणीतून उपस्थितांना समजावून सांगितले. अण्णा मुन यांनी शूरवीरांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका असे आवाहन केले. अध्यक्षता करताना अप्पाराव मुन यांनी तथागत सम्यक समबुद्धाची प्रज्ञा, शिल, करुणा, समताच पूर्ण भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तारू शकते हे आवर्जून सांगितले, त्यांनी पुणे करार गांधीचे उपोषण,बाबासाहेबांची साक्ष, मसुदा समितीचे बाबासाहेबांचे कार्य, गोलमेज परिषदेत बाबासाहेबानी केलेली मागणी, असा प्रवास समजावून सांगितला आणि उपस्थितांनी सदैव जागृत राहून आपल्या डोक्यातील चित्तमल काढूण टाकावा, आपला तथा प्रबुद्ध भरताचा विकास करून घ्यावा असे आवाहन केले.