*शिवप्रसाद कदम* प्रतिनिधी निवघा
निवघा बाजार प्रतिनिधी दि. १
येथून जवळच असलेल्या वरूला ता हदगाव येथील एक शिवभक्त नारायणराव केरबाराव शिंदे ( ५५ ) हे पिंपळगाव येथील मठाधिपती ह . भ प श्री व्यंकटस्वामी महाराज यांचे निस्सीम भक्त होत . त्यांची पिंपळगाव येथे नियमीत ये जा असतेच . निवघा बाजार येथील प्रसिद्ध भुसार व्यापारी म्हणून ते सर्वदुर परीचीत असून ते प्रगतशीत शेतकरीही आहेत . महाराजांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवपुराणाचे वाचन व पठण केले त्यामधे महादेवाच्या पिंडीला किंवा पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्यातून आत्मकल्याण आणि सदगती मिळते असा उल्लेख वाचनात आढळला आणि मग याच विचाराने जंग जंग पछाडून त्यांनी आपले दैनंदीन व्यवहार बाजुला सारत आपल्याच शेतामधे असलेल्या पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचा निर्णय घेतला .
१ जुलै २०२४ रोजी या प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमाला सुरुवात करून त्यांनी नियमीत गत ६ महिने दररोज सकाळी ७ ते ९ यावेळेत तीन ते साडेतीन हजार प्रदक्षिणा घालून दि . १ जुलै २०२५ रोजी एकूण पाच लाख पन्नास हजार पाचशे पंचावन्न प्रदक्षिणा पुर्ण केल्या . या दरम्यान त्यांनी गत सहा महिने शेतातच वास्तव्य केले आणि महामृत्यूंजय मंत्रा चा जप करत प्रदक्षिणा पुर्ण केल्या , दरम्यान च्या काळात पावसातही त्यांनी आपल्या प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमात खंड पडू दिला नाही . सकाळी अल्पोपहार आणि संध्याकाळी जेवन अशीच दिनचर्या त्यांची गत सहा महिन्यात होती . १ जानेवारी रोजी ह . भ . प . सचिन महाराज धर्माधिकारी यांच्या सुमधुर किर्तनाचे आयोजन करून पिंपळेश्वर मठाचे मठाधिपती कमलेश्वर गीरी महाराज यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशिर्वचनाने या प्रदक्षिणा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . किर्तन झाल्यानंतर नगरभोजना चा लाभ ग्रामस्थासह पंचक्रोशीतील भावीकांनी घेतला . या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य चंद्रशेखर पाटील कोळीकर , निवघा व्यापारी संघटना माजी अध्यक्ष मधुकर पाटील , माजी उपाध्यक्ष अनंतकुमार जैन , राजेश माटाळकर, विजय पाटील कोळीकर , अविनाश बमरुळे, मोतीराम बमरुळे , गणेशराव भोयर आदीसह मोठा जनसमुदाय उपस्थीत होता .





Social Plugin