Ticker

6/recent/ticker-posts

वयाच्या 90 व्या वर्षी वर्धनगडाची सफर



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

पेडगाव ता खटाव येथील सासर असणाऱ्या आणि वर्धनगड माहेर असणाऱ्या तानुबाई एकनाथ जगदाळे यांनी वयाच्या 90 व्या वर्षी वर्धनगड चढत तरुणाई पुढे आदर्श निर्माण केला आहे. हल्ली वयाच्या साठीत माणसांना विविध व्याधी जडत आहेत, परंतु तंदुरुस्त असलेल्या तानूआज्जी यांनी कोणतीही मदत न घेता आपल्या सून आणि नातवंडांसह गडाची सफर केली. लहानपणापासूनच धाडसी असलेल्या तानुआज्जीनी वर्धनगड चढून वर्धनी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा परशुराम व मोहन, सून, नातवंडे होती.