संदिप गावडे @ प्रतिनिधी
'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमाअंतर्गत येथील मिर्झा गालिब जनरल उर्दू लायब्ररीच्या वतीने सामूहिक वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी, तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये यांच्यामार्फत राबवण्यात येतो. यामध्ये सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालयातील वाचक यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके वाचन करण्याचा सामूहिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण व पुस्तक कथन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
यानुसार आष्टा येथील मिर्झा गालिब जनरल उर्दू लायब्ररीने सामूहिक वाचन घेतले. या सामूहिक वाचन उपक्रमात आष्टा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.झीनत आत्तार, माजी नगरसेवक नियाजूलहक नायकवडी, जिल्हा परिषद उर्दू शाळा नं. ५ च्या मुख्याध्यापिका सौ. फरजाना संदे, मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.आमिना शरीकमसलत यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी तसेच मिर्झा गालिब लायब्ररीचे अध्यक्ष इम्तियाज मुन्शी, उपाध्यक्ष उस्मान जमादार, सेक्रेटरी आबिद मुल्ला, सल्लागार अध्यक्ष शिराज मुजावर, रिजवान नायकवडी तसेच संचालक व सल्लागार मंडळ व कर्मचारी यांचा सहभाग होता.





Social Plugin