मितेश जैन - कल्याण प्रतिनिधी
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका संचलित पीएम श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय रबाळे, नवी मुंबई येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्यामार्फत राबविण्यात आलेल्या नशा मुक्त परिसर अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला शालेय परिपाठामध्ये मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनी सर्वांना ही शपथ दिली.
मुख्याध्यापक अमोल खरसंबळे यांनी दारू, चरस ,गांजा, अफीम ,सिगारेट गुटखा ,तंबाखू यापासून आपण लांब राहावे व कोणी करत असेल तर त्यांनाही मज्जाव करावा असं आपल्या मनोगत मधून सांगितलं.
क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे यांनीही तंबाखू, गुटखा बिडी ,सिगारेट, गांजा ,मावा या नशा युक्त पदार्थापासून आपल्या शरीराला धोका आहे यापासून वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर त्याचबरोबर शारीरिक व्याधी आपल्याला होतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून स्वतःला प्रवृत्ती केले पाहिजे अशी माहिती सांगितली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सिडको एक्जीबीशन सेंटर या ठिकाणी नशा मुक्त पर अभियान राबविण्यात आले होतो यासाठी मुख्यमंत्री व वनमंत्री त्याचबरोबर सिने अभिनेते जॉन इब्राहिम यांनी येऊन मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास शाळेतील शिक्षक राजू राठोड,विनोद झापडे, दिपक कटरे, मेथाजी देसाई, दिलीप निंबारा व तीस विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन सिडको एक्जीबिशन सेंटर या ठिकाणी नशा मुक्ती पर अभियान पोस्टर्स व व्हिडिओ चित्रफित यातून माहिती घेतली व सादर अभियान यशस्वी होण्यासाठी हातभार लावला





Social Plugin