प्रतिनिधी. शेख इमरान सुलतानपुर
लोणार तालुक्यातील महत्वपुर्ण असलेल्या सुलतानपुर ग्रामपंचायती ची विविध विषयांच्या अनुषंगाने असलेली ग्रामसभा काही ग्रामस्थांमुळे प्रचंड गदारोळात संपन्न झाली
३१ डिसेंबर ला १२ वाजेदरम्याण वामनराव झोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत भवनात आयोजीत ग्रामसभेत मागील सभेचे वाचन व मंजुरी देण्या बरोबर डीजे बंदी , प्लास्टीक बंदी , संजयगांधी , श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे केवायसी कागदपत्र घेण्या सोबतच सन २५ २६ चा आपले गांव आपला विकास आराखडा तयार करणे या विषयांसह अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषया संदर्भाने या सभेचे आयोजन होते ग्राविआ. गजानन कावरखे यांणी विषयांचे वाचन करीत सभेला सुरवात केली दरम्यान शासननियमांच्या आधीन राहुन डीजे बंदिला मंजुरात देण्यात येणार असल्याचे असल्याचे ग्राविआ गजानन कावरखे नीं सांगीतले तसेच ग्रामसभेत विविध चर्चेच्या बरोबरच महिलांच्या मुत्री व प्रसाधन गृहाच्या आणि प्रवासी निवाऱ्याच्या मुद्दया बरोबरच इतर विकास कामांच्या समस्यांना घेऊन काहींनी एकच गोंधळ घातला आशातच अनेक विषयांवर साधक -बाधक चर्चा न होता ही सभा प्रचंड गदारोळातच गुंडाळण्यात आली यावेळी डॉ. हेमराज लाहोटी तं.मु.अ. राजेश पिंपरकर , तलाठी संतोष पनाड , मुख्याध्यापक सुभाष टकले , पोहेकॉ राजेश जाधव , पोकॉ सुनिल नागरे , पत्रकार बांधवां सह ग्रामपंचायत कर्मचारी , ग्रामस्थ व सर्वश्री सदस्य उपस्थित होते .
" सर्व सामान्य नागरीक हेच ग्रामसभेचे मुख्यकेंद्रबिंदु व सदस्य असतात आशा वेळी ग्रामविकासाच्या संदर्भाने त्यांना लोकप्रतिनिधीं व उपस्थीत शासकीय कर्मचारी यांना गावाच्या समस्या संदर्भाने प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो तसेच त्यांच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर देऊन उपस्थित ग्रामस्थांचे समाधान करणे हे या ठीकाणी अपेक्षीत असतांना तसे न होता प्रचंड गदारोळ होऊन सर्वसामाण्य नागरिकांचा भ्रमनिरास झाल्याने सुज्ञ नागरिकांन मधे रोष दिसुन आला "
क्रॅप्शन : ग्रामसभेत बोलताना ग्राविअ. गजानन कावरखे .





Social Plugin