प्रतिनिधी.शेख इमरान सुलतानपूर
सहकार विद्या मंदिर सुलतानपूर येथे आयोजित तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शनीत डॉ भुतडा बहुउद्देशिय संस्था सुलतानपूर द्वारा संचालित स्व.जे डी भुतडा कलानिकेतन माध्य व उच्च माध्य विद्यालय कारेगांव फाटा चे विद्यार्थी आयुष राजेश बुरकुल , धिरज गजानन लंबे , सुदर्शन विलास बुरकूल यांनी सादर केलेल्या " स्मार्ट सीटी " या उपकरणाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या उपकरणात नाविन्यपूर्ण दृष्टिकोन समोर ठेवून प्रदूषण मुक्त स्मार्ट सीटी दाखवण्यात आली .
हे उपकरण विज्ञान शिक्षक श्री एम बी राठोड सर,सचिव श्री मनोज भुतडा सर , मुख्याध्यापिका कु एस.टी.दुंड्यार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने आणि कल्पकतेने उपकरण तयार केले होते, ज्यामुळे परीक्षक मंडळाने त्यांना प्रथम क्रमांकात गौरवले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री डॉ श्रीरामजी भुतडा साहेब यांनी अभिनंदन केले आहे. या उपकरणासाठी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले व जिल्हास्तरीय प्रदर्शनात भाग घेण्याचा मार्ग खुला झाला आहे.





Social Plugin