बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी महाराज यांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे गुरुवार दि. २ रोजी सकाळी दहा वाजता भव्य श्वान शर्यती आहेत. रसिकप्रेमींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.
शर्यतीमधील प्रथम ५ क्रमांकाच्या विजेत्या श्वान मालकांना अनुक्रमे ५१ हजार, ३१ हजार, २१ हजार, १५ हजार, ११ हजार तर सहा ते दहा क्रमांक ७ हजार, अकरा ते पंधरा क्रमांक ५ हजार, सोळा ते वीस क्रमांक ३ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. प्रत्येक विजेत्या श्वान मालकास आकर्षक चषक दिला जाणार आहे. सकाळी दहा वाजता ही शर्यत सातारा-पंढरपूर रोडवरील यात्रा स्थळावर रंगणार आहे. श्वानांची नोंद फक्त ऑनलाईनच केली जाईल. दि. १ जानेवारीपर्यंत श्वान मालकांनी आपल्या श्वानांची नोंद ऑनलाईन करावी. शर्यतीच्या दिवशी सकाळी दहा वाजता मैदानावर लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे लॉट पाडले जातील. सर्व श्वानांना मास्क वापरणे आवश्यक आहे. श्वान शर्यती महाराष्ट्र ग्रेहाऊंड असोसिएशनच्या नियमानुसार होतील श्वान शर्यतीचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण होईल. शर्यतीस पुसेगाव पॅटर्न डॉग रेस नुसार नर गटाने शर्यतीस प्रारंभ होईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव विशेष परिश्रम घेत आहेत.





Social Plugin