बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
अनोख्या उपक्रमासाठी राज्यातील १२ पथकांचा सहभाग
महाराष्ट्रातील क्लोरोनेट (कलाट), ट्रंपेट, सेक्सोफोन, ढोल ड्रम, एपोनियम (मोठा बाजा) कलाकारांना व्यासपीठ मिळावे, पारंपरिक व म्युझिकल बँड कलेचे जतन व्हावे, यासाठी पुसगाव येथे बँड महोत्सवाचे आयोजन केले जाते.श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त श्री तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे गुरुवारी (ता. दोन) सकाळी साडेआठ वाजता द्वितीय बँड महोत्सव होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी केले.
यात्रा स्थळावरील कबड्डी ग्राउंडवर होणाऱ्या या बँड महोत्सवात सिद्धेश्वर ब्रास बँड (कागवाड, जि. बेळगाव), श्री नृसिंह सरस्वती ब्रास बँड (नृसिंहवाडी), अनमोल ब्रास बँड (बीड), अमर ब्रास बँड (बारामती), राजकमल ब्रास बँड (मडगाव, गोवा), नटराज ब्रास बँड (बारामती), झंकार ब्रास बँड (किल्ले मच्छिंद्रगड, जि. सांगली), जिजामाता प्रोफेशनल ब्रास बँड (लाटे), बिस्मिल्ला ब्रास बँड (कऱ्हाड), हनीफभाई ब्रास बँड (किन्हई), अमोल ब्रास बँड (पुसेगाव), शशिकांत ब्रास बँड (पुसेगाव) हे बारा ब्रास बँड पथक सहभागी होतील.
यावेळी बँड कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मकबुल इनामदार गुरुजी ट्रंपेटवादक (खातगुण, ता. खटाव) व सदाशिवराव जाधव क्लोरोनेटवादक (लोधवडे, ता. माण) यांना श्री सेवागिरी महाराज कलाजीवन पुरस्कार प्रदान केला जाईल, तसेच बँड कला वृद्धिंगत होण्यासाठी अग्रक्रमाने कलेची जोपासना करणाऱ्या नवोदित बँड कलाकारांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाईल, अशी माहिती विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी दिली.





Social Plugin