Ticker

6/recent/ticker-posts

बीड व परभणी जिल्ह्यातील निघृण हत्यांमधील आरोपींना फासावर लटकवा .



सकल मराठा समाजाच्या वतिने निषेध मोर्चा द्वारे मा . मुख्यमंत्री यांना दिले लेखी निवेदन .

मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

     बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या निघृन हत्या या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना पुरोगामी महाराष्ट्रामधे घडल्या आहेत . या घटनेच्या निषेधार्थ मालेगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतिने मा . मुख्यमंत्री यांना मा . तहसीलदार मालेगांव यांच्या मार्फत लेखी निवेदन देण्यात आले . 

       हा शिव शाहु फुले आंबेडकरी विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र असुन या महाराष्ट्रामधे कायद्याचे राज्य आहे की नाही ? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे . दररोज होणारे बलात्कार , खुन , दरोडे , मारामाऱ्या , टोळीयुध्दे , नशील्या पदार्थांचा काळाबाजार , यांना राजकिय वरदहस्त असल्याचे अनेक पुरावे पुढे येत आहेत . राजकिय नेतेच जर गुंड प्रवृतीला पाठीसी घालत असतील तर सर्वसामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा ? असा प्रश्न विचारला जात आहे . बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांना अशाच राजकीय वरदस्त असलेल्या गुंडांकडून अतिशय अमानुषपणे जिवे मारण्यात आले आहे. त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत .राजकीय वरदस्त असला तर आपले कोणीच काही बिघडू शकत नाही अशी धारणा या गुंडांची झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा भयभीत झाला आहे. संतोष देशमुख हे अतिशय आदर्श असे युवा सरपंच होते. त्यांचे अपहरण करून अमानुषपणे छळ करून त्यांना जीवे मारण्यात आले आहे. 

       त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील पोलीस कोठडीमध्ये अत्यंत निर्दयी असा खून करण्यात आला आहे. या दोन्ही घटना अतिशय निंदनीय असून त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे .या दोन्ही घटनेतील जबाबदार असलेल्या व मास्टरमाइंड असलेल्या नराधमांना त्वरित अटक करण्यात यावी. तसेच त्यांच्या संपत्ती जप्त करण्यात याव्यात. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांना सहा महिन्याच्या आत फासावर लटकवण्यात यावे. त्याचप्रमाणे मृत्तकाच्या कुटुंबातील एकाला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे आणि मृतकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत निधी देण्यात यावा. अशा मागण्या मालेगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत . २ डिसेंबर रोजी येथील पोलीस स्टेशन समोर जमा होऊन सिव्हील लाईन मार्गे शेकडो युवकांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन मा. तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले . या निवेदन देतेवेळी मालेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेते , सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी , व्यावसाईक , वकील, व सर्वच क्षेत्रातील . शेकडो युवक सहभागी झाले होते.