Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीचा डिंगडॉंग स्पोर्ट्स ठरला 'वैभवदादा चषक २०२४' क्रिकेट हिंदकेसरी



संदिप गावडे,  प्रतिनिधी 


         वैभव दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील अहिल्या ग्रुप वाघाची तालीम यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वैभवदादा चषक २०२४ हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेत सांगलीचा डिंगडॉंग स्पोर्ट्स प्रथम क्रमांकाने क्रिकेट हिंदकेसरी या मानाच्या गदेचा मानकरी ठरला. 

       या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष शैलेश सावंत, तानाजी सुर्यवंशी, माजी नगरसेवक प्रकाश मिरजकर-शिंदे, संतोष लकांबरे, संदीप औघडे, साजिद इनामदार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

        यावेळी बोलताना वैभव शिंदे म्हणाले, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाही. त्यामुळे या खेळामध्ये खूप संयम बाळगावा लागतो. हा अंतिम सामना देखील याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच मैदानी खेळामुळे शारीरिक व मानसिक ताकद मिळते. पण सध्याच्या मोबाईलच्या युगात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लहान बालक, युवक यांनी मैदानी खेळ खेळण्यावर भर द्यायला हवा. 

     अटीतटीचा अंतिम सामना डिंगडॉंग स्पोर्ट्स सांगली विरुद्ध वाघाची तालीम आष्टा या संघादरम्यान झाला. दोन वेळा सुपर ओव्हर खेळाव्या लागलेल्या अंतिम सामन्यात प्रत्येक चेंडूवर क्रीडा रसिकांची धाकधूक वाढत होती. शेवटी अखेरच्या चेंडूवर डिंगडॉंग स्पोर्ट्स सांगलीने रोमहर्षक विजय मिळवला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक डिंगडॉंग स्पोर्ट्स सांगली, व्दितीय क्रमांक वाघाची तालीम मंडळ आष्टा, तृतीय क्रमांक साईदत्त स्पोर्ट्स दुधगाव, चतुर्थ क्रमांक डिग्रज स्पोर्ट्स डिग्रज यांनी मिळविला.

      या स्पर्धेचे संयोजन अमर शेळके, विजय कटारे, इंद्रजित हिरुगडे, सुरज आटुगडे, अभिषेक शेळके ,गणेश टोमके, दिपक थोटे,तानाजी टकले, नातु मुजावर, वैभव माने, चंद्रकांत संत्रे, सागर जगताप,राजू शिंदे, सत्यजित शिंदे,हेमंत मोहिते, खंडेराव काळोखे, दतराज हिप्परकर , निखिल पाटील, महावीर वाडकर, विजय कांबळे, उत्कर्ष माने, धनाजी दळवी यांनी केले.