Ticker

6/recent/ticker-posts

प्लास्टिक चहा कपावर बंदी, मेडशी ग्रामपंचायतचा महत्त्वाचा ठराव



 मालेगाव  प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

 मेडशी : ग्रामपंचायत कार्यालय मेडशी कडून मासिक सभा दिनांक 27/ 12 /2024 रोजी ठराव क्रमांक 08 नुसार मेडशी गाव परिसरातील सर्व दुकानदार व चहा हॉटेल व्यवसायिक, यांनी प्लास्टिक कपाचा वापर न करता त्या ऐवजी चिनी मातीचे कप किंवा काचेचे ग्लास वापरावे.तसेच गावातील सर्व दुकानदार यांनी प्लास्टिक कपाची विक्री करू नाही. कारण प्लास्टिक चहाचे कप व कागदी कप हे केमिकल मिश्रित असल्यामुळे गावातील नागरिकांना कॅन्सर सारखे आजार जळण्यात मदत होऊ शकते म्हणून आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकते ते टाळण्यासाठी 02/01/2025 पासून मेडशी गावामध्ये प्लास्टिक चहा कपावर बंदी घालून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा ठराव पारित केला.

 व तसेच 02/01/2025 पासून मेडशी परिसरातील कुठल्याही दुकानवर प्लास्टिक कप या वस्तूची विक्री करताना किंवा हॉटेलमध्ये प्लास्टिक कपावर चहा विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर प्रथम 1000 रुपये दंड, दुसऱ्या वेळेस 2000 रुपये तर तिसऱ्या वेळेस 3000 रुपये इतके दंड आकारण्यात येईल. तसेच यानंतरही पुन्हा आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीररित्या दंडात्मक कारवाई येईल.

भागवत बोरकाडे (ग्रामविकास अधिकारी मेडशी), शेख जमीर शेख गणीभाई( सरपंच),सौ संध्याताई भगवानराव घुगे (उपसरपंच) व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा पाऊल उचलत मेडशी ग्रामपंचायतला आदर्श ठरेल असे कार्य करण्याचा निराधार करत हा महत्त्वाचा ठराव पारित करून सगळ्यांना सूचना देत मेडशी ग्रामपंचायत अंतर्गत प्लास्टिक चहा कपावर बंदी घालण्याचा प्रशांसनीय निर्णय घेतला