Ticker

6/recent/ticker-posts

जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार सुमित खंडारे यांना राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्काराने सन्मानित



बुलढाणा -(साखरखेर्डा)

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वृक्षमित्र स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व तसेच समाजभूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, या भगव्या भव्य दिव्य पुरस्कार सोहळा वितरणामध्ये यावेळी सुमित रामकिसन खंडारे जनप्रहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष, S9TV जिल्हा प्रतिनिधी, दैनिक सेवाशक्ति टाईम्स, तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज, पत्रकार तथा संचालक इन्स्पायर कोचिंग क्लासेस मेहकर यांना  संत गाडगे बाबा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,या कार्यक्रमाचे आयोजक सचिन खंडारे ,अर्जुन गवई यांनी सुमित रामकिसन खंडारे यांनी आजपर्यंत सामाजिक व पत्रकारिता मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दखल घेत सामाजिक कार्याची व पत्रकारी करिता यासाठी केलेले कार्य, संघटित व असंघटित कामगारांना न्यायव हक्क मिळवून देण्यासाठी जन प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून कमी नोंद देण्यासाठी प्रयत्न करीत राहिले मेहकर मध्ये नोंदणी खूप कामगारांना दोन वेळा सुरू करण्याचे कार्य यांनी केले विविध प्रकारच्या कामगारांच्या योजनांसाठी कार्य केले तसेच इन्स्पायर कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अल्प दरात शिकवण्याचे कार्य केले 

तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता प्रत्येक बातमीची दखल घेत असतात, हे सर्व कार्य करत असताना आपल्या मुलीच्या स्वरा सुमित खंडारे पहिला वाढदिवस पालावरील मुलांना फराळाचे वाटप करून साजरा केला दुसरा वाढदिवस अपंग मुकबधिर शाळेमध्ये जेवण देऊन साजरा केला. आणि तिसरा वाढदिवस अंध मुलांच्या शाळेत फराळाचे वाटप करून साजरा केला, या सर्व कार्याची दखल घेत, सुमित रामकिसन खंडारे यांना राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, उपस्थित रविकांत तुपकर , उपविभागीय अधिकारी संजय खडसे , रावसाहेब देशपांडे केंद्रप्रमुख, सय्यद रफिक उपसरपंच, गजानन करेवाड ठाणेदार साखरखेर्डा, अर्जुन गवई, रामदास सिंग राजपूत उपसरपंच, वर्षाताई गंगा ललित सेठ अग्रवाल नितीन कांयदे,प्रवीण गीते गजेंद्र गवई,हे उपस्थित होते,तर सूत्रसंचालन वैशाली तायडे व आभार सचिन खंडारे यांनी केले.