Ticker

6/recent/ticker-posts

शौर्य दिवस दिन पराक्रमी शहिदांना अभिवादन



मालेगाव प्रतिनिधी- जावेद धन्नू भवानीवाले 


    तालुक्यातील आमखेडा येथील सारनाथ बुद्ध विहार येथे भिमा कोरेगाव येथील पाचशे शूरवीर पराक्रमी पूर्वजांच्या २०७ वा शौर्य दिवस दिन साजरा करण्यात येऊन पराक्रमी आपल्या पूर्वजांना शहिदांना अभिवादन करण्यात आले.

   समता सैनीक दलाच्या आमखेडा शाखेतर्फे आयोजित शाहिद मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाला प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून पूजा पाठ व वंदना घेण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने धम्म ध्वजारोहण करण्यात आले आणि शौर्य दिनाचे औचित्य साधत शूरवीर पूर्वजजांना मानवंदना देण्यात आली.

   समता सैनिक दलाच्या तालुका प्रमुख वैशाली गवई व जेष्ठ समता सैनिक रंजना खडसे यांनी शौर्य दिनाचे महत्त्व सांगितले. मानवंदना कार्यक्रमात वैशाली गवई यांच्या नेतृत्वाखाली रंजना खडसे,कंचन बनसोड,संगिता बनसोड,कुंता बनसोड, छाया बनसोड,कुसुम वानखेडे, लक्ष्मी भगत, सवीता बनसोड,रत्नकला कांबळे आदी समता सैनिक दलाच्या तुकडीने मानवंदना दिली.