बुध . दि .[प्रकाश राजेघाटगे]
श्री.सेवागिरी महाराजांची यात्रा ही महाराष्ट्रातील इतर यात्रेपेक्षा वेगळी यात्रा आहे. यात्रेतच कृषी प्रदर्शन भरविल्यामुळे शेतकऱ्यांना कृषी निगडित ज्ञान प्राप्त होते. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव [ ऑडीट ] प्रिं. डॉ .राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय ११वा खुला युवा महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . व्यासपीठावर मठाधिपती १०८प.पू.श्री.महंत सुंदरगिरी महाराज , चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त श्री. रणधीर जाधव, श्री. संतोष जाधव, श्री. संतोष वाघ, श्री. सचिन देशमुख, श्री. गौरव जाधव ,युवा महोत्सवाचे सचिव प्रा.डॉ. संजय क्षीरसागर, प्रभारी प्राचार्य डॉ .आर. पी. भोसले , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप पोमण ,श्री. विजय गायकवाड, प्राचार्य श्री. दत्तात्रय गोफणे, श्री. अशोक सावंत, सौ. हेमलता देशमुख व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
प्रिं. डॉ. मोरे पुढे म्हणाले,'सेवागिरी यात्रेतील खुला युवा महोत्सवाच्या माध्यमातून तरुणासाठी लोकनृत्य , रेकॉर्ड लोकनृत्य ,लोकनाट्य, पथनाट्य, समूह गायन, समूहगीत इत्यादी स्पर्धेच्या आयोजना बरोबरच शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरविल्यामुळे शेतकऱ्यांना यात्रेच्या आनंदा बरोबरच कृषी क्षेत्रातील ज्ञान मिळत आहे. व रोजगार मिळू पाहणारा युवक वर्ग यात्रेच्या कृषी प्रदर्शनांमधून दिसून येत आहे. तसेच यात्रेतील प्रदर्शनामध्ये शेतीसाठी उपयुक्त असणारे शेतीपूरक ज्ञान, शेतीशी निगडित असलेले विविध कंपनीचे लावण्यात आलेले स्टॉल पहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन माहिती प्राप्त होत आहे. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सेवगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री. रणधीर जाधव यांनी मानले. सुत्रसंचालन मोहनराव गुरव यांनी केले .
कार्यक्रमासाठी जिल्हातील विविध कॉलेजचे विद्यार्थी -विदयार्थीनी , श्री सेवागिरी महाराजांचे अनेक भक्त व भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.





Social Plugin