Ticker

6/recent/ticker-posts

गारवडी शाळेच्या बालबाजारास ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद



*छोट्या बाजाराची मोठी कमाल 2 तासात तब्बल १४ ,३७० रुपयांची उलाढाल*  

  बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान वाढीस लागावे , गणिती ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात यावे या उद्देशाने जि . प. प्राथमिक शाळा, गारवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा बालबाजार  भरवण्यात आला होता . या बालबाजाराचे उद्‌घाटन गारवडी गावचे ज्येष्ठ नागरिक चंद्रभाऊ कदम यांचे हस्ते करण्यात आले.

               बालबाजाराचे उद्‌घाटन होताच खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली.  विद्यार्थ्यांनी कोबी , फ्लॉवर , मुळा, पावटा, घेवडा, वांगी , टोमॅटो, मेथी, पालक यासारखा शेतातील तसेच शाळेच्या परसबागेतील भाजीपाला विक्रीसाठी ठेवला होता. खाऊगल्ली हा बाजाराचा आकर्षणाचा विषय ठरला. भेळ, इडली, पाणीपुरी, भजी , वडापाव यासारखे खाद्यपदार्थ चाखण्यास गर्दी झाली होती. बालबाजारातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराची माहिती झाली. तसेच बेरीज- वजाबाकी, कमी -जास्त, नफा- तोटा या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली . अल्पावधीतच विद्यार्थ्यांचा भाजीपाला व खाऊ यांची विक्री झाली. केवळ दोन तासातच तब्बल १४, ३७० रुपयांची उलाढाल या बालबाजारात झाली .

              या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण आवळे, शिक्षक सुनिल जगदाळे , विवेकानंद घोरपडे , दिपाली जाधव , अनिता जगताप , अजित फडतरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .