प्रतिनिधी -संजय भरदुक मंपिर
मंगरुळपीर दि १९ (वार्ताहर) विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम च्या वतीने जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा महामेळावा,मान्यवरांचा सत्कार,प्रकल्पग्रस्त महिलांचा हळदी कुंक कार्यक्रम व्यंकटेश सेवा समिती वाशीम च्या श्री. तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, सोनखास रोड, लाखाळा वाशीम येथे दि. १९ जानेवारी रोजी संपन्न झाला.
यावेळी मंचावर महामेळाव्याचे अध्यक्ष मा. बाबुसिंगजी महाराज,पोहरागड पिठाचे धर्मगुरू, आमदार विधानपरिषद तर प्रमुख उपस्थितीत मा. भावनाताई गवळी,मा.खा. तथा आमदार विधानपरिषद, मा. किरणराव सरनाईक आमदार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ, मा.अमितभाऊ झनक आमदार रिसोड, मालेगाव विधानसभा मतदारसंघ, मा.ॲड.विजयराव जाधव मा. आमदार तथा भा.ज.पा. प्रदेश कार्यकारणी सदस्य,मा. भुवनेश्वरी एस, जिल्हाधिकारी वाशीम यांचे प्रतिनिधी मा.निलेश पळसकर तहसीलदार वाशीम,मा.माधवराव अंभोरे जेष्ठ पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ वाशीम,मा. हेमंतकुमार चव्हाण कार्यकारी अभियंता ल. पा. वाशीम, मा. सौ. अर्चनाताई खोरणे जि. प. सदस्या वाशीम, मा. माणिकराव गंगावणे समिती जिल्हाध्यक्ष, समिती पदाधिकारी मा. शिवदास पाटील ताठे ,मा. बाबुसिंगजी पवार, मा. भावरावजी मापारी मा. सरपंच इ.मंचावर उपस्थिती होते.
प्रकल्पग्रस्तांच्या महामेळावा चे अध्यक्ष धर्मगुरू,आमदार विधानपरिषद बाबूसिंगजी महाराज तथा उपस्थित सर्व मान्यवरांचा व्यंकटेश सेवा समिती वाशीम च्या वतीने मा. आमदार विजयराव जाधव ,राम विजयराव जाधव, यांनी यथोचित सत्कार केला.
विदर्भ बळीराजा प्रकल्प ग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम च्या वतीने वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प ग्रस्तांचा महामेळावा संपन्न झाला यामध्ये आजी माजी आमदार यांनी शेतकर्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर विचार मंथन केले, महिला पुरुष यांचा महामेळावा व आमदार मान्यवरांचा सत्कार तसेच महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ बळीराजा प्रकल्प ग्रस्त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गूरूजी यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत जोशी तर आभार नंदकिशोर कांबळे सर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त बंधू भगिनी उपस्थित होते.





Social Plugin