अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ
/प्रतिनिधी
जिल्ह्यातील अतिवृष्टी, पीकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ३१ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सोमवारी (दि.२०) रोजी दिला. यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले, की यावर्षी अतिवृष्टी अनुदान आणि पीकविमा रक्कम मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्यानं शेतकरी सरकार विरोधात संताप व्यक्त करत आहे.
वारंवार निवेदन आणि मागण्या करूनही सरकार या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने येत्या ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली त्यानंतर पंचनामे करण्यात आल. सरकारकडून ४१३ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेत. तरीही प्रशासनाने हे अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत. अग्रीम पीकविमा विम्यासाठी जिल्ह्यासाठी २७० कोटी रुपये मंजूर झालेत पण हे देखील अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही.
.jpeg)




Social Plugin