प्रकाश तौरला ४० हजार रुपये स्विकारतांना पकडले
जालना/प्रतिनिधी अंबड मयूर वाव्हळ
उपविभागात ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम केल्यानंतर बील काढण्यासाठी कंत्राटदाराकडे ५० हजाराची लाच मागुन त्यापैकी ४० हजार रुपये स्विकारतांना महावितरणचा अतिरीक्त कार्यकारी अभियंता प्रकाश तौर यास आज बुधवारी (ता. १५) रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महावितरणकडून खाजगी कंत्राटदारांमार्फत विविधविभागात ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम केले जाते. अंबड विभागातही हे काम करण्यात आले होते. मात्र, बील न मिळाल्याने संबंधीत कंत्राटदाराने कार्यकारी अभियंता प्रकाश तौर यांची भेट घेतली असता बील काढण्यासाठी ५० हजाराची लाच मागण्यात आली होती. तडजोडीअंती त्यांनी ४० हजार रुपये स्विकारण्याची तयारीही दर्शविली. मात्र, लाच देण्याची ईच्छा नसल्याने कंत्राटदाराने लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार या पडताळणी करण्यात आली
असता तथ्य आढळून आल्याने या विभागाने सापळा रचुन प्रकाश तौर यास ४० हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधिक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक बाळु जाधवर, सापळा अधिकारी पो- लीस निरिक्षक अविनाश घरबुडे, अंमलदार जावेद शेख, शिवलिंग खुळे, गणेश बुजाडे, भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने केली.
One attachment
• Scanned by Gmail
%20(1).jpeg)




Social Plugin